BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Pyaaz Kachori

Photo of Pyaaz Kachori by Jyothi Rajesh at BetterButter
28897
550
0(0)
1

कांद्याची कचोरी

Feb-15-2016
Jyothi Rajesh
150 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • राजस्थान
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

 1. 2 वाट्या मैदा
 2. 1 लहान चमचा मीठ
 3. 1 लहान चमचा तेल
 4. आवश्यकतेनुसार पाणी
 5. तळण्यासाठी तेल :
 6. भरण्यासाठी :
 7. 3 कांदे
 8. 2 हिरव्या मिरच्या
 9. 1 लहान चमचा जिरे
 10. 1 लहान चमचा आले-लसणाची पेस्ट
 11. 1 लहान चमचा धणेपूड
 12. 1 लहान चमचा हळद
 13. 1 लहान चमचा लाल तिखट
 14. 1 लहान चमचा भाजलेली जिरेपूड
 15. 1 लहान चमचा गरम मसाला
 16. मीठ चवीनुसार
 17. 1 लहान चमचा तेल

सूचना

 1. एका वाडग्यात मैदा, मीठ आणि तेल एकत्र करून एकजीव करा. पाणी घालून लुसलुशीत पीठ मळा. तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. जवळजवळ 1 ते 2 तास झाकून ठेवा.
 2. तोपर्यंत सारण बनविण्यास लागणारे साहित्य तयार करा. एक मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जीर घालून तडतडवा. नंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळा.
 3. नंतर त्यात आले-लसणाची पेस्ट घाला आणि त्याचा कच्चा गंध जाईपर्यंत शिजवा.
 4. आता सर्व मसाले घाला आणि नीट मिसळा. चवीनुसार मीठ घाला आणि मंद आचेवर एक मिनिटासाठी शिजवा. गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
 5. पिठाला हलक्या हाताने मळा आणि याचे एकसमान भाग करा. तसेच भरण्याच्या सारणाचे देखील एकसमान भाग करा.
 6. आता तळण्यासाठी एका मोठ्या कढईत तेल गरम करा.
 7. पिठाला घेऊन एक गोलाकार गोळा बनवा. त्याला 3 इंच वर्तुळात चपटे लाटा. नंतर मध्यभागी सारण ठेवा. नंतर सर्व बाजूंच्या कडा एकत्र करून बंद करा आणि पुन्हा 3 इंच गोलाकार लाटा आणि बाजूला ठेवा.
 8. ही प्रक्रिया सर्व गोळ्यांबरोबर करा.
 9. गरम तेलात एक एक कचोरी मध्यम आचेवर 3 मिनिटांपर्यंत तळा. नंतर आच कमी करून 5 मिनिटे तळा. नंतर तेल निथळण्यासाठी त्यांना किचन पेपरवर काढून ठेवा.
 10. या स्वादिष्ट कांद्याच्या कचोऱ्या त्वरित वाढा. तिखट हिरवी चटणी आणि गोड खजूर-चिंचेच्या चटणीबरोबर या छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर