मुख्यपृष्ठ / पाककृती / Butter Dosa with Sejwan chutany

Photo of Butter Dosa with Sejwan chutany by pranali deshmukh at BetterButter
1370
7
0.0(1)
0

Butter Dosa with Sejwan chutany

Dec-11-2017
pranali deshmukh
600 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Butter Dosa with Sejwan chutany कृती बद्दल

" लेडीज बायकांचा " आवडता मेनू मसाला डोसा .....डोसा म्हणजे  अख्खा स्वयंपाकच कारण त्याच्याबरोबर भाजी + सांबर  +चटणी . इतकं सगळं केल्यावर दुसरं काही करायचं मनच होत नाही .पण आम्हाला लंच + डिनर +ब्रेकफास्ट कशातही हा मेनू चालतो ...but what about नवरोबा ???? त्यांना वरण... भात दोन भाज्या  पोळी ...कोशिंबीर ...ताक ...पापड ...सॅलड असं दोन्हीवेळेला अगदी ठरलेलं जेवणच आवडतं ... मग काय करणार बाबा ??? तर डोसा बनवायचा पण without भाजी, सांबर ,चटणी ....जरा त्रासहि वाचतो . आणि एक वेगळी चव पण अनुभवायला मिळते .           म्हणूनच अगदी सोप्प आहे बटर  डोसा with  शेजवान चटणी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 10

  1. चार वाटी तांदूळ
  2. एक वाटी उडीद डाळ
  3. अर्धी वाटी चणा डाळ
  4. मेथी
  5. पोहे
  6. बारीक कांदा
  7. हिरवी मिरची
  8. लाल मिरची
  9. व्हिनेगर
  10. सोया सॉस
  11. टोमॅटो केचप
  12. तेल
  13. बारीक शेव
  14. मीठ
  15. साखर
  16. बटर
  17. आले लसूण पेस्ट

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ 5-6 तास भिजत घाला .
  2. त्यामध्ये मेथीदाणे पण टाका .
  3. भिजल्यावर पसाभर  पोहे पण टाका .
  4. हे सगळं मिक्सर मधून बारीक काढून घ्या .
  5. पीठ 4-5 तास आंबवण्यासाठी ठेवा .
  6. पिठामध्ये मीठ घाला आणि छान मिक्स करा
  7. डोशाच्या तव्यावर हलकेच मिठाचे पाणी शिंपडा ....
  8. कारण तवा अगदी थंड नको आणि खूप तापलेला पण नको .
  9. तव्यावर वाटीने पीठ गोलाकार किंवा अंडाकृती पसरवा .
  10. शेजवान चटणी ...बारीक कांदा ...शेव ...पटापट स्प्रेड करा .
  11. आजूबाजूनी बटर सोडा " दिलखोलके "  बरं का !!!!
  12. सुटायला आल्यावर छान गोल घडी करा ....
  13. असा पण खाऊ शकता किंवा छान  पीस कट  करा   ......आणि कट पीस डोसा एन्जॉय करा .
  14. शेजवान चटणी
  15. 1 वाटी  लाल (काश्मिरी  )  मिरच्या 1/2 ,1 तास पाण्यात भिजत घाला .
  16. मिक्सर मधून बारीक करा, जरा पाणी टाका .
  17. पॅनमध्ये दोन  चमचे  तेल टाका गरम झालं कि, एक चमचा आले लसूण बारीक कापून टाका    .
  18. मिरची पेस्ट टाका आणि  परतावा .
  19. तेल सुटत आलं की 1 चमचा टोमॅटो केचप ,
  20. 1/2 चमचा सोया सॊस , 1/2 व्हिनेगर , मीठ ,1/4 चमचा साखर .
  21. हे छान मिक्स करा .आणि थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या .
  22. शेजवान चटणी रेडी ....

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
atul chikane
Dec-12-2017
atul chikane   Dec-12-2017

Mastach :ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर